ऍक्सिस म्युच्युअल फंडची ‘शगुन एसआयपी’ सुविधा सुरू
ग्रॅमच्या स्वरूपात सोने-चांदीत डिजिटल गुंतवणुकीची संधी मुंबई, 01 सप्टेंबर (हिं.स.) : भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या ऍक्सिस म्युच्युअल फंडने ‘शगुन एसआयपी’ ही नवीन डिजिटल पद्धतशीर गुंतवणूक सुविधा सुरू केली आहे. या सु
सोने-चांदी लोगो


ग्रॅमच्या स्वरूपात सोने-चांदीत डिजिटल गुंतवणुकीची संधी

मुंबई, 01 सप्टेंबर (हिं.स.) : भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या ऍक्सिस म्युच्युअल फंडने ‘शगुन एसआयपी’ ही नवीन डिजिटल पद्धतशीर गुंतवणूक सुविधा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे गुंतवणूकदारांना ॲक्सिस गोल्ड फंड आणि ॲक्सिस सिल्व्हर फंड ऑफ फंडमध्ये ग्रॅमच्या स्वरूपात नियमित गुंतवणूक करता येणार आहे. गुंतवणुकीला उद्दिष्टाधारित स्वरूप देत टप्प्याटप्प्याने सोने आणि चांदी जमा करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पारंपरिक पद्धतीने सोने-चांदीची नियमित बचत करण्याच्या सवयीला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन ‘शगुन एसआयपी’ची रचना करण्यात आली आहे. प्रत्यक्ष सोने किंवा चांदी खरेदी करून ते सुरक्षित ठेवण्याची गरज नसल्याने साठवणूक, सुरक्षितता आणि शुद्धतेशी संबंधित अडचणी कमी होतात. योजनांमधील गुंतवणूक अनुक्रमे 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्यात आणि 99.9 टक्के शुद्धतेच्या चांदीत केली जाते. गुंतवणूकदारांना या माध्यमातून 25 किलोपर्यंत सोने आणि 50 किलोपर्यंत चांदी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवता येते.‘शगुन एसआयपी’मध्ये गुंतवणूकदारांना कमी रकमेची नियमित गुंतवणूक करण्याची लवचिकता मिळते. बाजारातील बदलत्या किमतीनुसार वेगवेगळ्या टप्प्यांवर खरेदी होत असल्याने एका विशिष्ट किमतीवर गुंतवणूक करण्याऐवजी कालांतराने खरेदी किमतीची सरासरी साधण्यास मदत होऊ शकते.

या सुविधेत उद्दिष्टाधारित गुंतवणुकीवर विशेष भर देण्यात आला आहे.

विवाह, मुलांचे शिक्षण, संपत्तीचे जतन यांसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूकदार विशिष्ट कालावधीत ठरावीक प्रमाणात सोने किंवा चांदी जमा करण्याचे लक्ष्य निश्चित करू शकतात. त्यानुसार आवश्यक गुंतवणुकीची रक्कम निश्चित करून वैयक्तिकृत गुंतवणूक योजना तयार करता येते.या सुविधेबाबत बोलताना ऍक्सिस म्युच्युअल फंडचे मुख्य डिजिटल अधिकारी बोनिफेस नॉरोन्हा यांनी सांगितले की, भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोने आणि चांदी महत्त्वाच्या मालमत्ता आहेत. दीर्घकाळात पद्धतशीरपणे मौल्यवान धातूंचा संचय करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ‘शगुन एसआयपी’ डिजिटल आणि उद्दिष्टाधारित अनुभव देणारी सुविधा असल्याचे त्यांनी नमूद केले.‘शगुन एसआयपी’ची सुविधा ऍक्सिस म्युच्युअल फंडच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे.---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande