रत्नागिरीत बाळासाहेब देवरस फिजिओथेरपी केंद्र सुरू
रत्नागिरी, 1 सप्टेंबर (हिं.स.) । झाडगाव येथील माध्वराव मुळ्ये भवनात रा. स्व. संघाच्या राष्ट्रीय सेवा समितीच्या कार्यालयात पपू बाळासाहेब देवरस फिजिओथेरपी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.केंद्राच्या नामफलकाचे अनावरण नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये आणि
रत्नागिरीतील झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात पपू बाळासाहेब देवरस फिजिओथेरपी केंद्राच्या फलकाचे उद्घाटन करताना नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये आणि राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पावरी. सोबत अन्य.


रत्नागिरी, 1 सप्टेंबर (हिं.स.) । झाडगाव येथील माध्वराव मुळ्ये भवनात रा. स्व. संघाच्या राष्ट्रीय सेवा समितीच्या कार्यालयात पपू बाळासाहेब देवरस फिजिओथेरपी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.केंद्राच्या नामफलकाचे अनावरण नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये आणि राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष संतोष पावरी यांच्या हस्ते झाले.

मुख्य कार्यक्रम श्रीमान पांडुरंग वैद्य सभागृहात पार पडला. सुरवातीला राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी संपूर्ण वंदे मातरम् गीत गायन केले. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि बाळासाहेब देवरस यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.राष्ट्रीय सेवा समिती कोषाध्यक्ष प्रशांत पाध्ये यांनी प्रास्ताविकाच राष्ट्रीय सेवा समितीतर्फे जिल्ह्यात चालवल्या जाणाऱ्या विविध सेवा प्रकल्पांची, उपक्रमाची माहिती दिली. तसेच सर्व सेवाकार्यांचा आढावा घेतला.प्रमुख वक्ते सेवाभारती कोकण प्रांत आरोग्य आयाम प्रमुख अविनाश जोशी यांनी संघाच्या सेवाभाव आणि इतर कार्याबद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर यांनी सेवाभाव व सेवाकार्य या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले.राष्ट्रीय सेवा सनितीचे कार्यवाह अनिरुद्ध लिमये यांनी आभार मानले.

प. पू. बाळासाहेब देवरस फिजिओपेरपी सेंटरमध्ये पाठदुखी, कंबरदुखी सायटिका, स्पॉंडिलायसीस, खांदा आखडणे, कंपवात, शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन आदी फिजिओथेरपी उपचार मिळणार आहेत. याकरिता नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी माधवराव मुळ्ये भवन येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande