यवतमाळ - अतिक्रमणावर चालला बुलडोजर; महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटविले
यवतमाळ, 01 सप्टेंबर, (हिं.स.)। शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१-अ तसेच शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिकेने आज पासून व्यापक मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जेसी
अतिक्रमणावर चालला बुलडोजर महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटविले


यवतमाळ, 01 सप्टेंबर, (हिं.स.)। शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१-अ तसेच शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिकेने आज पासून व्यापक मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जेसीबी आणि कर्मचार्!यांच्या पथकामार्फत अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र, नोटीसा देऊनही अतिक्रमण न काढणा-यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. मुख्याधिकारी केदारे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने संबंधित अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, शहरात एकीकडे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असताना दुसरीकडे मात्र नाल्यांवरील स्लॅबच्या कामावरून नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या कार्यकाळात पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी तुंबू नये म्हणून नाल्यांवरील अनेक अनधिकृत स्लॅब तोडून नाले मोकळे करण्यात आले होते. आता त्याच नाल्यांवर पुन्हा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर, महामार्ग लगतच्या अतिक्रमण कारवाईबाबत काही दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील ३० वर्षांपासून व्यवसाय करीत असलेल्या काही दुकानधारकांना कोणतीही शहानिशा न करता रस्ता रुंदीकरण अथवा नगरपालिका हद्दीत दुकान येत असल्याचे सांगून अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेषतः रस्त्यालगतची दुकाने वगळून काही अंतरावर असलेल्या दुकानांनाही नोटिसा मिळाल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई करताना सर्व संबंधित मालमत्तांची हद्द, रस्ता रुंदीकरणाची निश्चित सीमा आणि अतिक्रमणाची वस्तुस्थिती याबाबत पारदर्शकपणे शहानिशा करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक व दुकानदारांकडून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande