मनोज जरांगेंसाठी समर्थक चिंतीत
छत्रपती संभाजीनगर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणासाठी आंदोलनरत मनोज जरांगे यांनी 3 दिवसांपासून अंतरवली सराटी या गावात पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती काहीशी ढासळल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक चिंत
मनोज जरांगेंसाठी समर्थक चिंतीत


छत्रपती संभाजीनगर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणासाठी आंदोलनरत मनोज जरांगे यांनी 3 दिवसांपासून अंतरवली सराटी या गावात पुन्हा

एकदा उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती काहीशी ढासळल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक चिंतीत झाले आहेत.

मनोज जरांगे यांच्या प्रकृतीसाठी महिलांनी देवासमोर जप-नामस्मरण करत प्रार्थना केली. यावेळी महिलांनी जरांगेंच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. मनोज जरांगे यांना काही झाल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा महिलां समर्थकांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande