नाशिक-मविप्र फार्मास्यूटिकल महाविद्यालयात नॅशनल फार्मसी वेल्फेअरची बैठक संपन्न
नाशिक, 01 सप्टेंबर (हिं.स.) मविप्र संचलित आडगांव येथील इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस महाविद्यालयात नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (एनपीडब्ल्यूए) च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारी मंडळाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. संघटनेचे ना
National Pharmacy Welfare


नाशिक, 01 सप्टेंबर (हिं.स.) मविप्र संचलित आडगांव येथील इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस महाविद्यालयात नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (एनपीडब्ल्यूए) च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारी मंडळाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये फार्मसी क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये ‘फार्मोत्सव २०२६’, जॉब फेअर (रोजगार मेळावा) चे नियोजन, शिक्षक व विद्यार्थी नवीन सदस्य नोंदणी मोहीम, शिष्यवृत्तीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे, प्रवेशप्रक्रिया लवकर पूर्ण करणे यांसह संघटनेच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या इतर विविध विषयांचा समावेश होता.

या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल, कार्यकारी अध्यक्ष प्रा. प्रवीण जावळे, सचिव डॉ. संपत नवले, सहसचिव डॉ. प्रफुल आडकर, ई. सी. मेंबर डॉ. स्वामी, उत्तर महाराष्ट्र रिजनचे अध्यक्ष डॉ. योगेश बाफना, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. प्रदीप बोडलस आणि पुणे ग्रामीण अध्यक्ष डॉ. तेजस पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अहिल्यानगरचे अध्यक्ष डॉ. मनोज सिरभाटे, नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन हिरे, धुळे अध्यक्ष डॉ. सचिन चोरडिया, नंदुरबार अध्यक्ष डॉ. पंकज चौधरी आणि जळगाव अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री यांच्यासह इतर सर्व कार्यकारणी सदस्य बैठकीस उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande