पाकिस्तानने एससीओ शिखर परिषदेच्या समूह छायाचित्रातून पंतप्रधान मोदींना वगळले
इस्लामाबाद , 01 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानने आपल्या सवयीप्रमाणे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान सोशल मीडियावर बालिशपणाचे प्रदर्शन केले. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून शेअर करण्यात आलेल्या एससीओने नेत्यांच्या सामूहिक छाय
पाकिस्तानने एससीओ शिखर परिषदेच्या समूह छायाचित्रातून पंतप्रधान मोदींना वगळले


इस्लामाबाद , 01 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानने आपल्या सवयीप्रमाणे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान सोशल मीडियावर बालिशपणाचे प्रदर्शन केले. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून शेअर करण्यात आलेल्या एससीओने नेत्यांच्या सामूहिक छायाचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रॉप करून हटवण्यात आले. क्रॉप केलेल्या या छायाचित्रात शाहबाज शरीफ यांना चलाखीने मध्यभागी दाखवण्यात आले.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केलेल्या छायाचित्रात संपूर्ण गट दिसत होता आणि त्यात शाहबाज शरीफ यांचाही समावेश होता. हे छायाचित्र मंगळवारी बिश्केक येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान काढण्यात आले होते. या छायाचित्रात 10 सदस्य देशांचे नेते एकत्र उभे राहून छायाचित्रासाठी पोझ देताना दिसत आहेत.

मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट केलेल्या छायाचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर काही नेत्यांना क्रॉप करून हटवण्यात आले. छायाचित्राची ही क्रॉप केलेली आवृत्ती अशा पद्धतीने तयार करण्यात आली होती की शाहबाज शरीफ गटाच्या अगदी मध्यभागी दिसावेत. त्यामागचा उद्देश शाहबाज शरीफ हे अधिक महत्त्वाच्या स्थानावर उभे होते, असा आभास निर्माण करण्याचा होता.मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केलेल्या मूळ छायाचित्रामुळे पाकिस्तानचा हा दावा किती हास्यास्पद होता, हे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात शाहबाज शरीफ हे उजवीकडून चौथ्या क्रमांकावर उभे होते, हे मूळ छायाचित्रावरून स्पष्ट होते.

पाकिस्तानची ही बालिश खेळी एवढ्यावरच थांबली नाही.फेसबुकवरील शाहबाज शरीफ यांच्या अधिकृत अकाउंटवरून बिश्केक येथे झालेल्या एससीओ नेत्यांच्या गोलमेज बैठकीचा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला.या व्हिडिओतूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यात आले होते.मात्र, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पाकिस्तानची ही बनवाबनवी तात्काळ ओळखली. पाकिस्तानच्या या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी अनेकांनी संपूर्ण गटाचे मूळ छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. काहींनी तर छायाचित्रात शाहबाज शरीफ यांच्या हातात भीक मागण्याचे कटोरेही दाखवले. या प्रकारामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या त्या जुन्या विधानाची आठवण झाली, ज्यात त्यांनी आर्थिक मदतीसाठी जगभर फिरावे लागल्याचे म्हटले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande