रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला; 12 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीय नागरिकाचाही समावेश
कीव, 01 सप्टेंबर (हिं.स.)।युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने रात्रीभर युक्रेनवर केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्
रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला; 12 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीय नागरिकाचाही समावेश


कीव, 01 सप्टेंबर (हिं.स.)।युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने रात्रीभर युक्रेनवर केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “एकूण १२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. या हल्ल्यात इतर अनेक जण जखमी झाले आहेत. आपल्या कुटुंबातील सदस्य आणि प्रियजन गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे.”

हल्ल्याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “अनेक शहरे आणि भागांमध्ये रशियन हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काल रात्रीपासूनच मदतकार्य सुरू आहे.केवळ कीव आणि आसपासच्या भागात सुमारे ३५० बचाव कर्मचारी कार्यरत आहेत. या हल्ल्यात मोठ्या संख्येने जेट-चालित ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. दुर्दैवाने, निवासी इमारती तसेच नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. बोरिस्पिलमध्ये पाच मजली निवासी इमारतीचे नुकसान झाले. तेथून ५० नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सर्व आवश्यक सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. व्यावसायिक आस्थापनांनाही लक्ष्य करण्यात आले. एकूणच, शहरात ४ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत.”

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे सांगितले, “काल संध्याकाळपासून ओडेसा आणि आसपासच्या भागांवर मार्गदर्शित हवाई बॉम्ब आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ले सुरू आहेत. हजारो कुटुंबे वीजविना आहेत आणि नागरिकांना शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. रोमानिया सीमा चौकी तसेच निर्यात पायाभूत सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य करून नुकसान पोहोचवण्यात आले. कीवमधील रेल्वे डेपोवरील हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला. खेरसॉन, डोनेत्स्क, झापोरिझ्झिया, खार्किव्ह, चेर्निहिव्ह, झायटोमिर, सुमी आणि निप्रो या भागांवरही हल्ले करण्यात आले.”

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियावर नागरिकांचे जास्तीत जास्त नुकसान करण्याच्या उद्देशाने हल्ले केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “रशिया नेहमीच अशा हल्ल्यांचे नियोजन करतो, ज्यामुळे लोकांच्या जीविताला जास्तीत जास्त धोका निर्माण होईल आणि हवाई संरक्षणाची क्षमता कमकुवत असेल तेव्हाच तो त्याच्या उद्देशात यशस्वी होतो. पर्ल आणि द्विपक्षीय पुरवठ्याच्या माध्यमातून युक्रेनला बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करणारी क्षमता मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे. हा पुरवठा वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. रशियन दहशतवादाचे बळी ठरणाऱ्या लोकांची संख्या ही मिळणाऱ्या प्रत्येक नवीन मदत पॅकेजवर थेट अवलंबून आहे. युक्रेनला अधिक मजबूत बनवण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande