सप्टेंबरच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात घसरण
जळगाव , 01 सप्टेंबर (हिं.स.) | गेल्या काही दिवसांपासून सोने दरात चढ-उतार सुरु आहे. मागच्या काही दिवसापूर्वी सोन्याच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला ताण दिला होता. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या खरेदीदार
gold and silver


जळगाव , 01 सप्टेंबर (हिं.स.) | गेल्या काही दिवसांपासून सोने दरात चढ-उतार सुरु आहे. मागच्या काही दिवसापूर्वी सोन्याच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला ताण दिला होता. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या खरेदीदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. आज १ सप्टेंबर रोजी जळगाव बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल १,०५० रुपयांची घसरण झाली आहे. सलग वाढणाऱ्या किमतींमुळे अनेकांनी सोने खरेदीचा विचार लांबणीवर टाकला होता, परंतु आजच्या या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही; चांदीचे दर स्थिर आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande