रत्नागिरी : शहर, ग्रामीण भाग अन् एमआयडीसीत मोकाट गुरांची समस्या तीव्र
रत्नागिरी, 1 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी शहर, परिसरातील ग्रामीण भाग तसेच एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या आणि श्वानांच्या संख्येत वाढ होत आहे. रस्त्यांवर अचानक धावणारी गुरे किंवा श्वानांमुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वा
रस्त्यांवरील मोकाट गुरे


रत्नागिरी, 1 सप्टेंबर (हिं.स.) । रत्नागिरी शहर, परिसरातील ग्रामीण भाग तसेच एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या आणि श्वानांच्या संख्येत वाढ होत आहे. रस्त्यांवर अचानक धावणारी गुरे किंवा श्वानांमुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असून, गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

एमआयडीसी परिसरातही मोकाट गुरांची संख्या वाढली आहे. परिसरातील अनेक रस्त्यांवर गुरे ठाण मांडून बसलेली दिसतात. औद्योगिक परिसरात वाहनांची सतत वर्दळ असताना रस्त्याच्या मधोमध किंवा बाजूला बसलेली गुरे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. अचानक रस्त्यावर धावणारी गुरे, रस्त्यात बसलेली जनावरे आणि भटक्या श्वानांमुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. रात्री किंवा पावसाळ्यात दृश्यमानता कमी असताना हा धोका आणखी गंभीर होतो.

या समस्येवर संबंधित यंत्रणांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची भावना आहे. एखादा गंभीर अपघात घडण्याची वाट न पाहता संबंधित यंत्रणांनी मोकाट गुरांचा बंदोबस्त, जनावरांच्या मालकांवर आवश्यक कारवाई तसेच भटक्या श्वानांच्या समस्येवर नियमानुसार उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande