ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा रत्नागिरीत मूक मोर्चा
रत्नागिरी, 1 सप्टेंबर (हिं.स.) । ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनतर्फे आज मूक मोर्चा काढण्यात आला. परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर
ग्रामपंचायत अधिकारी मोर्चा


रत्नागिरी, 1 सप्टेंबर (हिं.स.) । ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनतर्फे आज मूक मोर्चा काढण्यात आला.

परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा निघाला. मोर्चात हजारो ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

शिवरे (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा एल्गार पुकारण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande