
पुणे, 01 सप्टेंबर (हिं.स.)। सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवी पेठ आणि सैनिकी मुलांचे वसतिगृह, पर्वती येथे अशासकीय कर्मचाऱ्यांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवी पेठ, पुणे-४११०३० येथे माळी पदासाठी, तर सैनिकी मुलांचे वसतिगृह, पर्वती, पुणे-४११००९ येथे पहारेकरी पदासाठी प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची भरती करण्यात येणार आहे.या पदांसाठी इच्छुक आणि पात्र माजी सैनिक तसेच इतर नागरिकांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत संबंधित वसतिगृहात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिकांशी ७७७६८०५८२४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर, तर मुलांच्या वसतिगृहाच्या अधीक्षकांशी ७३००२३१०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत (नि.) यांनी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु