परभणी - विविध नागरी सुविधांच्या विकासकामांना तब्बल २९ कोटींची प्रशासकीय मान्यता
परभणी, 10 सप्टेंबर (हिं.स.)। पाथरी व सोनपेठ तालुक्यातील पूरामुळे पुनर्वसित झालेल्या लिंबा, मुदगल, विटा, वाणीसंगम, दुधगाव व डाकू पिंपरी या ६ गावांतील विविध नागरी सुविधांच्या विकासकामांना तब्बल ₹२९ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राष
अ


परभणी, 10 सप्टेंबर (हिं.स.)। पाथरी व सोनपेठ तालुक्यातील पूरामुळे पुनर्वसित झालेल्या लिंबा, मुदगल, विटा, वाणीसंगम, दुधगाव व डाकू पिंपरी या ६ गावांतील विविध नागरी सुविधांच्या विकासकामांना तब्बल ₹२९ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे बरोबर

पूरानंतर नागरिकांचे पुनर्वसन केवळ सुरक्षित ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यापुरते मर्यादित नसते; पुनर्वसित गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, नाले, सार्वजनिक सुविधा आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांचा सक्षम विकास करणे तितकेच आवश्यक असते. या सुविधा सक्षम झाल्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होते, गावांचा नियोजित विकास होतो आणि पुनर्वसित कुटुंबांना सुरक्षित व सन्मानजनक जीवन जगण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होते.

याच उद्देशाने पुनर्वसित गावांतील प्रलंबित नागरी सुविधांच्या कामांसाठी मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्येक टप्प्यावर या प्रश्नाचा आग्रह धरून निधी व प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande