सप्तश्रृंगीगड-नांदुरी रस्ता बंद ठेवण्याच्या आदेशात सुधारणा
नाशिक, 10 सप्टेंबर, (हिं.स.)। सप्तश्रृंगीगड ते नांदुरी रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने दि. १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याबाबत यापूर्वी आदेश निर्गमित करण्यात आला होता. या आदेशात आता सुधारणा कर
सप्तश्रृंगीगड-नांदुरी रस्ता बंद ठेवण्याच्या आदेशात सुधारणा


नाशिक, 10 सप्टेंबर, (हिं.स.)। सप्तश्रृंगीगड ते नांदुरी रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने दि. १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याबाबत यापूर्वी आदेश निर्गमित करण्यात आला होता. या आदेशात आता सुधारणा करण्यात आली आहे.

सुधारित आदेशानुसार नांदुरी ते सप्तश्रृंगीगड रस्ता दि. १० ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत इतर दिवशी बंद राहणार असून शनिवार व रविवार दि. १२,१३,१९,२०, व २६ सप्टेंबर रोजी रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, नांदुरी ते सप्तश्रृंगीगड पायी मार्ग भाविकांसाठी नियमित सुरू राहणार असून सप्तश्रृंगी देवी मंदिरही नियमितपणे खुले राहणार आहे. अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) व स्कूल बस यांना या रस्ता बंदीतून सूट देण्यात आली आहे.सर्व संबंधित यंत्रणांनी रस्ता बंद व वाहतूक व्यवस्थेबाबत आवश्यक ती दक्षता घेऊन कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची नोंद घेऊन कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सुधारित आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कळवण डॉ. कश्मिरा संखे यांनी दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी निर्गमित केला असून तो तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande