फरार हरनेक सिंगचे अमेरिकेतून प्रत्यार्पण, दिल्ली विमानतळावर सीबीआयकडून अटक
नवी दिल्ली, १० सप्टेंबर (हिं.स.) केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) सिंगापूर घोटाळा प्रकरणातील आरोपी हरनेक सिंगला अमेरिकेतून प्रत्यार्पणाची परवानगी मिळवून येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. हरनेक सिंग २०१३ पासून फरार होता. त्याच
फरार हरनेक सिंगचे अमेरिकेतून प्रत्यार्पण


नवी दिल्ली, १० सप्टेंबर (हिं.स.) केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) सिंगापूर घोटाळा प्रकरणातील आरोपी हरनेक सिंगला अमेरिकेतून प्रत्यार्पणाची परवानगी मिळवून येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. हरनेक सिंग २०१३ पासून फरार होता. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस आणि लुक-आउट सर्क्युलर (एलओसी) जारी करण्यात आले होते. सीबीआय लवकरच त्याला हरियाणातील पंचकुला येथील विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करणार आहे.

सीबीआयने सांगितले की, या प्रकरणात २०१६ मध्ये कट, फसवणूक, बनावटगिरी, बनावट कागदपत्रांचा वापर आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला होता. तपासादरम्यान असे उघड झाले की, २०१३ मध्ये भारतातून कार्यरत असलेल्या फसवणूक करणाऱ्यांनी स्पूफ केलेल्या कॉलद्वारे सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या भारतीय नागरिकांशी संपर्क साधला होता. सिंगापूरचे इमिग्रेशन अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या फोन करणाऱ्यांनी, लँडिंग फॉर्मवर खोटी माहिती देऊन पीडितांना धमकावले, ज्यामुळे त्यांच्यावर फौजदारी खटला भरला जाऊ शकतो आणि त्यांना देशाबाहेर काढले जाऊ शकते. त्यानंतर, कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी, पीडितांना दंड किंवा तडजोड शुल्क म्हणून वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरद्वारे भारतात पैसे पाठवण्यासाठी दबाव टाकला गेला. तपासात हे देखील सिद्ध झाले की, फसवणुकीने मिळवलेला निधी हरनेक सिंगने त्याचे सहआरोपी आदित्य भारद्वाज आणि दीपक जैन यांच्यासोबत चालवलेल्या मनी-ट्रान्सफर आउटलेटद्वारे स्वीकारण्यात आला होता.

गुन्हा केल्यानंतर, हरनेक सिंग मे २०१३ मध्ये भारतातून फरार झाला आणि त्यानंतर एका दशकाहून अधिक काळ अटक टाळून बेकायदेशीरपणे अमेरिकेत दाखल झाला. मात्र, तो फरार असताना, पंचकुला येथील विशेष न्यायालयात सहआरोपी आदित्य भारद्वाज आणि दीपक जैन यांच्यावरील खटला संपला आणि २६ मे २०२५ रोजी दोघांनाही दोषी ठरवण्यात आले.

अमेरिकेच्या न्याय विभागामार्फत समन्स आणि जामीनपात्र वॉरंट बजावूनही, हरनेक सिंग खटल्यासाठी न्यायालयात हजर झाला नाही. परिणामी, पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने २२ एप्रिल २०२४ रोजी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतर, सीबीआयने इंटरपोलच्या माध्यमातून आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आणि त्याच्याविरुद्ध लुक-आऊट सर्क्युलरही जारी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande