तिवसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
अमरावती, 10 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तहसीलदारांना निवेदन; अपुऱ्या पावसाने खरीप पिके संकटात अपुऱ्या पावसामुळे तिवसा तालुक्यातील खरीप पिके संकटात सापडली असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्
तिवसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या


अमरावती, 10 सप्टेंबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तहसीलदारांना निवेदन; अपुऱ्या पावसाने खरीप पिके संकटात

अपुऱ्या पावसामुळे तिवसा तालुक्यातील खरीप पिके संकटात सापडली असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तिवसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने करण्यात आली.यासंदर्भात तहसीलदार डॉ. मयूर कडसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन, संत्री व पराटी तहसील कार्यालयात आणून आपली व्यथा प्रशासनासमोर मांडली.अल्प पावसाच्या भरवशावर सोयाबीन, तूर व कापसाची पेरणी करण्यात आली. मात्र, काही ठिकाणी बियाण्यांच्या उगवणीच्या तक्रारींमुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून, अनेक भागांत पिके कोमेजण्याच्या स्थितीत आहेत. सोयाबीनला शेंगा भरण्याच्या काळातही पुरेसा पाऊस नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, पीक विम्याचा लाभ द्यावा आणि आवश्यक सवलतींसह हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी हेमंत बोबडे, सतीश वानखडे, पुरुषोत्तम दाते यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande