अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संचालकपदी डॉ.अर्चना अडसड-रोठे यांची निवड
अमरावती, 10 सप्टेंबर (हिं.स.)। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्या वतीने झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत धामणगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष डॉ.अर्चना अडसड रोठे यांची अविरोध निवड झाली आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्था
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संचालकपदी डॉ.अर्चना अडसड-रोठे यांची अविरोध निवड


अमरावती, 10 सप्टेंबर (हिं.स.)। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्या वतीने झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत धामणगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष डॉ.अर्चना अडसड रोठे यांची अविरोध निवड झाली आहे.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना १९२६ या वर्षात झाली. शहरी भागातील नगर योजना ,आरोग्य, पर्यावरण शिक्षण, सामाजिक अशा ५४ क्षेत्रामध्ये ही संस्था कामे करते या संस्थेची संचालक पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. महाराष्ट्रातून केवळ दोन जागा उपलब्ध होत्या आणि विशेष बाब म्हणजे या दोन्ही जागांवर अविरोध निवड झाली.यामध्ये धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्ष डॉ. अर्चनाअडसड-रोठे यांची संचालक पदी निवड झाल्याने धामणगाव रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

------------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande