धाराशिव : स्थानिक तक्रार समितीसाठी महिलांकडून अर्ज मागविले
धाराशिव, १० सप्टेंबर (हिं.स.) : कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षा आणि दोन महिला सदस्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी
धाराशिव : स्थानिक तक्रार समितीसाठी महिलांकडून अर्ज मागविले


धाराशिव, १० सप्टेंबर (हिं.स.) : कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षा आणि दोन महिला सदस्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड केली जाणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी, इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जदार महिलांचे किमान वय ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आवश्यक पूरक कागदपत्रे सादर करावीत. या पदांवरील निवडीचे अधिकार जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे राहणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मानधन देण्यात येणार नसले, तरी नियमानुसार बैठक भत्ता देण्यात येईल.

अध्यक्षा व सदस्यांसाठी पात्रता

समितीच्या अध्यक्षा पदासाठी उमेदवारास सामाजिक कार्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणे तसेच महिलांच्या प्रश्नांप्रती बांधीलकी असणे आवश्यक आहे.दोन सदस्यांपैकी महिलांच्या समस्यांशी बांधीलकी असलेल्या अशासकीय संघटना, संघ किंवा स्वयंसेवी संस्थांशी संबंधित अथवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेल्या व्यक्तीची निवड केली जाणार आहे. यापैकी एका सदस्याकडे कायद्याचे (Legal) ज्ञान अथवा पात्रता असणे आवश्यक आहे. तर दुसरा सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्याक समाजातील महिला असणे आवश्यक आहे.

२२ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत

विहीत नमुन्यातील अर्ज ८ सप्टेंबरपासून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत, तळ मजला, कक्ष क्रमांक २७, धाराशिव येथे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी आपले अर्ज तसेच स्वसाक्षांकित पूरक कागदपत्रे २२ सप्टेंबर २०२६पर्यंत संबंधित कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande