
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर (हिं.स.) । सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चढ-उताराची स्थिती कायम असून, आज, गुरुवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारासोबतच देशांतर्गत बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत.
जागतिक बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरावर दबाव दिसून आला. बाजार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला दर काहीसे स्थिर राहिले, मात्र त्यानंतर दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाली.
कॉमेक्सवर सोन्या-चांदीचे दर घसरले आंतरराष्ट्रीय बाजारातील कॉमेक्सच्यै आकडेवारीनुसार, सोन्याच्या दरात सुमारे 0.07 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा भाव 4,457.80 डॉलर प्रति औंस या पातळीवर पोहोचले. दुसरीकडे, चांदीच्या दरात तुलनेने मोठी घसरण झाली. चांदी सुमारे 0.80 टक्क्यांनी घसरून 68.095 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत होती.
एमसीएक्सवरही सोने-चांदी स्वस्त
देशांतर्गत वायदा बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सकाळी सोन्याचा भाव 113 रुपयांनी घसरून 1,53,690 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर व्यवहार करत होता.चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली. सकाळी सुमारे 9 वाजता चांदीचा भाव 1,150 रुपयांनी घसरून 2,43,108 रुपये प्रति किलोग्रॅम या पातळीवर पोहोचला.
देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर
देशांतर्गत बाजारात विविध शुद्धतेनुसार सोन्याच्या दरातही घसरण झाली. उपलब्ध आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,54,240 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 1,41,387 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.याशिवाय, 18 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,15,680 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर व्यवहार करत होता.चांदीचा देशांतर्गत दरही घसरून सुमारे 2,42,820 रुपये प्रति किलोग्रॅम या पातळीवर असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून दिसून आले.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी