नांदेड जिल्ह्याला 'दुष्काळग्रस्त' जाहीर करावे - भाजप आ. अमरनाथ राजूरकर
नांदेड, 10 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेडचे भाजप आमदार अमरनाथ राजूरकर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेऊन एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. मागील दीड महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे
Q


नांदेड, 10 सप्टेंबर (हिं.स.)।

नांदेडचे भाजप आमदार अमरनाथ राजूरकर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेऊन एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली.

मागील दीड महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पिक धोक्यात आले आहे. शेतकरी अत्यंत बिकट आणि हवालदिल स्थितीत सापडला आहे.

याच गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नांदेड जिल्ह्याला 'दुष्काळग्रस्त' जाहीर करण्यात यावे आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आग्रही विनंती केली.

यावेळी नांदेड महापालिकेच्या महापौर कविताताई मुळे, स्थायी समिती सभापती विरेंद्र सिंग गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, मा. महापौर जयश्री पावडे, नगरसेवीका कविता गड्डम, निलेश पावडे, संतोष मुळे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande