आमदार विटेकरांकडून मनोज जरांगेच्या प्रकृतीची चौकशी
परभणी, १० सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथर्डी येथील आमदार राजेश विटेकर यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याप्रसंगी श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत
Q


परभणी, १० सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथर्डी येथील आमदार राजेश विटेकर यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याप्रसंगी श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज तसेच आमदार विजयसिंह पंडित उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे २९ ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेला संघर्ष आणि समाजाच्या हक्कासाठी घेतली जाणारी भूमिका प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समाजाच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक आणि सन्मानजनक तोडगा निघावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

0000000000000000000000

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande