फिलिपिन्समध्ये प्रवासी फेरीला भीषण आग; ५ जणांचा मृत्यू, ८७ बेपत्ता
मनीला, 10 सप्टेंबर (हिं.स.)।फिलीपिन्समध्ये बुधवारी एका प्रवासी फेरीला अचानक आग लागली. ही दुर्घटना देशाच्या पश्चिम भागातील समुद्रात घडली. आग लागल्यानंतर मोठ्या संख्येने लोक बेपत्ता झाले. फिलिपिन्स कोस्ट गार्डच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत
फिलिपिन्समध्ये प्रवासी फेरीला भीषण आग; ५ जणांचा मृत्यू, ८७ बेपत्ता


मनीला, 10 सप्टेंबर (हिं.स.)।फिलीपिन्समध्ये बुधवारी एका प्रवासी फेरीला अचानक आग लागली. ही दुर्घटना देशाच्या पश्चिम भागातील समुद्रात घडली. आग लागल्यानंतर मोठ्या संख्येने लोक बेपत्ता झाले. फिलिपिन्स कोस्ट गार्डच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून ४२ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. बचावकार्य अद्याप सुरू असल्याने बेपत्ता व्यक्तींची संख्या पुढे बदलू शकते.

फिलिपिन्स कोस्ट गार्डच्या प्रवक्त्या कमोडोर नोएमी कायाबायब यांनी सांगितले की, फेरीवर एकूण १३४ जण प्रवास करत होते. यामध्ये ११७ प्रवासी आणि १७ कर्मचारी होते. आग लागल्यानंतर अनेक जणांचा ठावठिकाणा लागलेला नाही. अधिकाऱ्यांनी सध्या ८७ जण बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. मात्र, शोध आणि बचावकार्य सुरू असल्याने हा आकडा बदलू शकतो.

‘एमव्ही जून एस्टर’ ही फेरी मनिलाहून निघाली होती. पलावन प्रांतातील कोरोनजवळ समुद्रात असताना बुधवारी फेरीला आग लागली. आग लागल्यानंतर फेरीवरील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दुर्घटनेचे ठिकाण पश्चिम फिलिपिन्सच्या समुद्री क्षेत्रात असल्याचे सांगण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

कोस्ट गार्डच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४२ जणांना वाचवण्यात आले असून ८७ जण बेपत्ता आहेत. मात्र, हा अंतिम आकडा नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोस्ट गार्डच्या पथकांकडून सातत्याने बचावकार्य सुरू असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये कोस्ट गार्डचे जवान बचावलेल्या लोकांकडे लाइफ जॅकेट फेकताना दिसत आहेत, तर त्यांच्या मागे फेरी जळताना दिसत आहे. छोट्या बोटींच्या मदतीनेही बचावलेल्या लोकांना कमी खोलीच्या पाण्यात आणण्यात आले.

फिलिपिन्सच्या द्वीपसमूहात फेरी वाहतूक हे प्रवासाचे एक सामान्य साधन आहे. वादळे, खराब देखभाल केलेल्या बोटी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे आणि सुरक्षा नियमांचे योग्य पालन न करणे, विशेषतः दुर्गम प्रांतांमध्ये, यांसारख्या कारणांमुळे समुद्री दुर्घटना वारंवार घडत असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande