विशाल बगले यांची कमाल! बोरवेलचे पाणी वाढवणाऱ्या भारतीय तंत्रज्ञानाचा ब्रिटनमध्ये डंका
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूरचे भूजल तंत्रज्ञान संशोधक विशाल अशोक बगले यांनी बोरवेल, ट्यूबवेल आणि वॉटरवेलमधील पाणी वाढवण्यासाठी विकसित केलेल्या ''केमिकल स्टिम्युलेशन सिस्टीम'' या तंत्रज्ञानाला भारत आणि ब्रिटनमध्ये बौद्धिक संपदा संरक्षण
विशाल बगले यांची कमाल! बोरवेलचे पाणी वाढवणाऱ्या भारतीय तंत्रज्ञानाचा ब्रिटनमध्ये डंका


सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।

सोलापूरचे भूजल तंत्रज्ञान संशोधक विशाल अशोक बगले यांनी बोरवेल, ट्यूबवेल आणि वॉटरवेलमधील पाणी वाढवण्यासाठी विकसित केलेल्या 'केमिकल स्टिम्युलेशन सिस्टीम' या तंत्रज्ञानाला भारत आणि ब्रिटनमध्ये बौद्धिक संपदा संरक्षण (पेटंट डिझाईन नोंदणी) मिळाले आहे.

बोरवेलमधील पाणी कमी होण्यामागील भूगर्भीय अडथळे लक्षात घेऊन, रासायनिक प्रक्रियेद्वारे जलउत्पादन क्षमता वाढवणारे हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान त्यांनी सोलापूर येथे यशस्वीरीत्या विकसित केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील २० हजारांहून अधिक बोरवेलवर या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला असून, टंचाईच्या काळात पाण्याचा स्रोत पुनरुज्जीवित करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. या प्रणालीच्या डिझाईनची नोंदणी भारतात मंजूर झाली असून, ब्रिटनमध्येही यापूर्वीच नोंदणी पूर्ण झाली आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रक्रियेच्या पेटंटसाठी भारत, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत अर्ज दाखल करण्यात आले असून, जर्मनी, युएई आणि ऑस्ट्रेलियामध्येही बौद्धिक संपदा संरक्षणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande