
छत्रपती संभाजीनगर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।
नांदूर मध्यमहेश्वर धरणाचे ओव्हरपलोचे पाणी पाटाद्वारे/ कॅनॉलद्वारे शिवना नदी पात्रात सोडावे या मागणीसाठी मालुंजा खुर्द (ता.गंगापूर ) येथील श्री.योगेश पवार, श्री.सोपान कवडे, श्री.विनायक मनाळ, श्री.संदीप पवार यांनी मागील बेमुदत उपोषण सुरू केले .
या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनी स्वः भेट देऊन यासंदर्भात लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल असे उपोषणकर्त्यांना आश्वस्त करत त्यांचे उपोषण सोडवले.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस श्री.दिलीप बनकर, श्री.महेश उबाळे. श्री.वाल्मिक शिरसाठ आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis