
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)। एकात्मिक बालविकास सेवा योजना उत्तर सोलापूर अंतर्गत विभाग मार्डी 2 मध्ये अंगणवाडी केंद्र कारंबा 1 येथे महिला व बालक पालक यांच्यासाठी वेलकम मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण समिती सदस्या चैतालीताई मुळे या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी पर्यवेक्षिका जयश्री गुंड यांनी प्रास्ताविक केले.
बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अंगणवाडीमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे साहित्य मांडणी द्वारे पालकांना माहिती देण्यात आली व बालकांच्या विकासामध्ये पालकांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पोषण आहाराचे महत्त्व सांगून मातांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मार्डी विभाग मधील सर्व अंगणवाडी सेविका ,मदतनीस पर्यवेक्षिका यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मातांना व बालकांना पालकांना महिला बालकल्याण समिती सदस्या चैताली मुळे यांनी मार्गदर्शन केले व सर्व सेविकांच्या विविध समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी तत्पर आहोत असे सांगितले. यावेळी पालक, पालक आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड