अल्पवयीन आरोपींना अमानुष वागणूक; पुणे पोलिसांवर मानवाधिकार आयोगाचे ताशेरे
पुणे, 10 सप्टेंबर (हिं.स.)। हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना वाहनाच्या बोनेटला बांधून त्यांची धिंड काढणे, तसेच अन्य एका प्रकरणात आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवून आणि गुडघ्यांवर चालायला लावत मारहाण करणे, या दोन घटनांची महाराष्ट्र राज्य मानवाधिका
CP Pune


पुणे, 10 सप्टेंबर (हिं.स.)। हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना वाहनाच्या बोनेटला बांधून त्यांची धिंड काढणे, तसेच अन्य एका प्रकरणात आरोपींना रस्त्यावर गुडघ्यावर बसवून आणि गुडघ्यांवर चालायला लावत मारहाण करणे, या दोन घटनांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत आयोगाने पुणे पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत.

या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांची भूमिका आयोगाने गंभीरपणे नोंदवली आहे. आरोपींना अशा प्रकारची वागणूक देण्यास प्रवृत्त करणे आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनास जबाबदार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. आरोपी कोणत्याही गुन्ह्यात सहभागी असला तरी त्याच्याशी कायद्यानुसार आणि मानवी हक्कांचा आदर राखूनच वर्तन करणे आवश्यक असल्याचे आयोगाच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande