आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी प्रतिका रावलला संधी
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर (हिं.स.)२०२६ च्या आशियाई खेळांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात बदल झाला आहे. जेमिमा रॉड्रिग्स दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नाही. तिच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. जेमिमा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त
प्रतिका रावल


नवी दिल्ली, 10 सप्टेंबर (हिं.स.)२०२६ च्या आशियाई खेळांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात बदल झाला आहे. जेमिमा रॉड्रिग्स दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नाही. तिच्या जागी प्रतिका रावलचा संघात समावेश करण्यात आला आहे. जेमिमा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त असून, ऑगस्टमध्ये 'हंड्रेड लीग'मध्ये 'सदर्न ब्रेव्ह' संघाकडून खेळल्यापासून ती मैदानाबाहेर आहे. अलीकडेच जेमिमाला २०२६ च्या आशिया कपच्या संघातूनही वगळण्यात आले होते, जिथे प्रतिकाला तिची जागा मिळाली.

प्रतिकाच्या नावावर केवळ तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आहेत. तिने २०२६ च्या महिला आशिया कपमध्ये या फॉरमॅटमध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. पण, तिला आतापर्यंत विशेष प्रभाव पाडता आलेला नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने २२, १० आणि ४ धावा केल्या आहेत. प्रतिका सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये वॉरविकशायर महिला संघाकडून एकदिवसीय चषक स्पर्धेत खेळणार होती. पण आशिया कपसाठी भारतीय संघात सामील झाल्यामुळे तिला तो करार सोडावा लागला.

प्रतीका २०२४ पासून एकही टी२० सामना खेळली नव्हती. २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ती दुखापतग्रस्त झाली होती. आणि तिला यामुळे काही महिन्यांनंतर महिला प्रीमियर लीगमध्ये खेळता आले नाही. दुखापत असूनही, डब्ल्यूपीएल लिलावात यूपी वॉरियर्स संघाने तिला ५० लाख रुपयांना विकत घेतले. मात्र, प्रतीका या स्पर्धेत अनुपस्थित राहिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande