सोलापूर - ६४८ ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांकडे
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील ६४८ ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविला जाणार आहे. जिल्ह्यात सध्या ७५० ग्रामपंचायतींवर प्रश
सोलापूर - ६४८ ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांकडे


सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील ६४८ ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविला जाणार आहे.

जिल्ह्यात सध्या ७५० ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीबाबत न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. उर्वरित ६४८ ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील विस्तार अधिकाऱ्यांची माहिती मागविली आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींची जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.

नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत) तसेच इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही अधिकाऱ्यांकडे चार ते सहा ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande