रुपेरी पडद्यापासून टेनिस कोर्टपर्यंत… आर. माधवनने अनुभवला यूएस ओपनचा रोमांच
मुंबई, 11 सप्टेंबर, (हिं.स.)। आर. माधवन हा असा कलाकार आहे जो कायम त्याचा कामामुळे चर्चेत असतो. त्याची काम निवडण्याची पद्धत बहुआयामी अभिनय या गोष्टीमुळे त्याची जगभर चर्चा आहे. चित्रपटसृष्टीतील झगमगाटाच्या पलीकडे जाऊन बघितलं तर आर माधवन हा मुळात एक र
रुपेरी पडद्यापासून टेनिस कोर्टपर्यंत… आर. माधवनने अनुभवला यूएस ओपनचा रोमांच


मुंबई, 11 सप्टेंबर, (हिं.स.)। आर. माधवन हा असा कलाकार आहे जो कायम त्याचा कामामुळे चर्चेत असतो. त्याची काम निवडण्याची पद्धत बहुआयामी अभिनय या गोष्टीमुळे त्याची जगभर चर्चा आहे. चित्रपटसृष्टीतील झगमगाटाच्या पलीकडे जाऊन बघितलं तर आर माधवन हा मुळात एक रसिक आणि कौतुक करावा असा कलाकार आहे.

रोजच्या व्यस्त शूट्स मधून थोडा वेळ काढून “रॉकेट्री” फेम या अभिनेत्याने क्रीडा विश्वातील अत्यंत रोमांचक अशा 'यूएस ओपन'च्या उपांत्यपूर्व सामन्यांचा (क्वार्टर-फायनल्स) न्यूयॉर्कमधील 'आर्थर ॲश स्टेडियम'वर प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेतला. या सामन्यांना उपस्थित राहणारा तो एकमेव भारतीय सेलिब्रिटी होता.

आर माधवन सोबतीने तिथे त्यांच्यासोबत कोलमन डोमिंगो, ॲना विंटूर, हुमा अबेदिन, लॅटो, टॉम फेल्टन, एम्मेट स्मिथ, ग्रेस ॲन नाडर, जो कीरी, सुझान लुची, ॲलन ह्युस्टन, काल पेन आणि इतर अनेक दिग्गज उपस्थित होते.

सोशल मीडियावर कोर्टसाइड भेटी बद्दल झलक शेअर करून आर माधवन याने खास अनुभव शेयर केला आहे. व्हिडीओ मध्ये तो अस देखील म्हणाला “जगातील अव्वल क्रमांकाच्या खेळाडूला यूएस ओपनमध्ये खेळताना पाहण्याची संधी रोज मिळत नाही”

आर माधवन साठी हा सोहळा अनुभवण खूप खास आहे. सामना पाहणे म्हणजे केवळ खेळ पाहणे नव्हे तर इतिहासाची घडामोड प्रत्यक्ष अनुभवण आहे. रुपेरी पडद्यावर कथा घडवणारा कलाकार असो किंवा न्यूयॉर्कमध्ये कोर्टच्या बाजूला बसून हा सोहळा (सामना ) पाहण्याचा अनुभव असो एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आर माधवन आपल्याला सतत हेच आठवण करून देतो की जिद्द आणि कष्टाची कदर करणे या गोष्टी जागतिक पातळीवर सारख्याच असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande