
बीड, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
बरड शिवारातील तांदळाची वाडी गायरान परिसरात तिरट जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नेकनूर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत ७ जणांना ताब्यात घेण्यात आले, तर १ आरोपी फरार झाला. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार आरोपीचा शोध सुरू असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis