छटाईच्या नावाखाली मोठ्या झाडांची कत्तल
अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील विद्युत तारांवर आलेल्या तथा इमारतीला धोका असलेल्या झाडांची छटाई करण्याची परवानगी स्थानिक नगरपालिकेकडून घेत चक्क १७ मोठमोठ्या झाडांना तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पालिकेमधीलच लोकप्र
छटाईच्या नावाखाली मोठ्या झाडांची कत्तल


अमरावती, 12 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील विद्युत तारांवर आलेल्या तथा इमारतीला धोका असलेल्या झाडांची छटाई करण्याची परवानगी स्थानिक नगरपालिकेकडून घेत चक्क १७ मोठमोठ्या झाडांना तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पालिकेमधीलच लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने हे कृत्य झाल्याने दर्यापूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दर्यापूर शहरातील विकासकामांच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, दर्यापूर नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दर्यापूर नगरपालिका परिसरालगत हनुमान मंदिराजवळील तब्बल १७ मोठी झाडे तोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत दर्यापूर नगरपालिकेकडून शहरातील झाडांच्या कटिंगसाठी विकासकामांशी संबंधित एका ठेकेदाराला काम देण्यात आल्याची माहिती असून, या कामाच्या आडून मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली जुनी व मोठी झाडे तोडण्यात आल्याने परिसरातील वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande