
नांदेड, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
नागपूर–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथील कोसळलेल्या पुलाची आ. अंबादास दानवे यांच्या समवेत आज पाहणी केली. निकृष्ट कामामुळे या मार्गावरील तब्बल चार पूल अशाच पद्धतीने कोसळल्याचे समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्ते आणि पुलांची अशी अवस्था होत असेल, तर कामाच्या दर्जाची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला
प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कामाची संपूर्ण माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जनतेच्या पैशातून होणारी विकासकामे दर्जेदार आणि टिकाऊ झालीच पाहिजेत. असे दानवे यांनी सांगितले.निकृष्ट काम करून जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख व्यकोबा येडे ,तालुकाप्रमुख सुनिल कदम,तालुकाप्रमुख पद्माकर सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis