गेवराईत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १४ जणांवर गुन्हा
बीड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। गेवराईतील जतेगाव रोडवरील जुगार अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने १० सप्टेंबर रोजी रात्री छापा टाकला. कारवाईत १४ जणांना ताब्यात घेत रोख रक्कम, १४ मोबाईल आणि ८ मोटारसायकली असा एकूण ६ लाख ७२
पोलीस कारवाई


बीड, 12 सप्टेंबर (हिं.स.)।

गेवराईतील जतेगाव रोडवरील जुगार अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने १० सप्टेंबर रोजी रात्री छापा टाकला. कारवाईत १४ जणांना ताब्यात घेत रोख रक्कम, १४ मोबाईल आणि ८ मोटारसायकली असा एकूण ६ लाख ७२ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande