
रत्नागिरी, 12 सप्टेंबर (हिं.स.) । राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून एकूण ९१ हजार ३६६ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
राजापूर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी ४१ हजार ३६६ रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाइल असा एकूण ९१ हजार ३६६ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
ऑल आऊट ऑपरेशनच्या माध्यमातून अवैध दारूविक्री व दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राजापूर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी