पाटोदा बस स्थानकात चोरी करणाऱ्या महिलेला १४ लाखांच्या मुद्देमालासह अटक
बीड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। पाटोदा बसस्थानक परिसरात महिलेच्या बॅगेतील सोने व रोख रक्कम चोरीला गेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत छडा लावला. या कारवाईत महिला आरोपीस ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरीस गेलेले ८ तोळे ४ ग्रॅम
पोलीस कारवाई


बीड, 12 सप्टेंबर (हिं.स.)।

पाटोदा बसस्थानक परिसरात महिलेच्या बॅगेतील सोने व रोख रक्कम चोरीला गेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत छडा लावला. या कारवाईत महिला आरोपीस ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरीस गेलेले ८ तोळे ४ ग्रॅम सोने आणि १० हजार रोख, असा एकूण १३ लाख ९७ हजार १६० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande