यवतमाळ : सीईओकडून झेडपीच्या विभागाचा आढावा
यवतमाळ, 12 सप्टेंबर (हिं.स.)। मंदार पत्की यांच्या बदलीनंतर काही काळ प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून धोत्रे यांनी जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळला. आता विशाल खत्री यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारताच झेडपी प्रशासनाच्या कामकाज
जिल्हा परिषद सीईओ मंदार खत्री आले ॲक्शन मोड'वर:रुजू होताच झेडपीच्या विभागाचा आढावा सुरू


यवतमाळ, 12 सप्टेंबर (हिं.स.)। मंदार पत्की यांच्या बदलीनंतर काही काळ प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून धोत्रे यांनी जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळला. आता विशाल खत्री यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारताच झेडपी प्रशासनाच्या कामकाजाला वेग देण्यास सुरुवात केली आहे. रुजू होताच त्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेण्याचा धडाका सुरू केल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांम ध्येही एकच धावपळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालकल्याण, कृषी, समाजकल्याण यांसह अनेक योजना राबवल्या जातात. या विभागांतील प्रत्यक्ष कामकाजाची स्थिती काय आहे, कोणती कामे प्रलंबित आहेत, योजनांची अंमलबजावणी कितपत झाली आहे, कोणत्या अडचणी येत आहेत, याची माहिती खत्री यांच्याकडून घेतली जात आहे. फक्त कागदावरील अहवालावर विसंबून न राहता विभागनिहाय कामकाज समजून घेण्यावर नव्या सीईओंचा भर असल्याचे दिसून येत आहे.

विभागनिहाय आढावा घेऊन प्रशासनातील त्रुटींवर काम विशाल खत्री यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेला पूर्णवेळ नियमित नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे विभागनिहाय आढावा घेऊन प्रशासनातील त्रुटी शोधणे, त्यावर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला आता वेग येण्याची अपेक्षा आहे. रुजू होताच सुरू झालेल्या आढावा बैठकांमुळे ‘नव्या सीईओंची कार्यशैली कशी राहणार?’ याची उत्सुकता झेडपी वर्तुळात निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande