इंडोनेशियातील जावा समुद्रात बेपत्ता जहाजातील १०२ प्रवाशांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू
जकार्ता, 13 सप्टेंबर (हिं.स.)।इंडोनेशियातील जावा समुद्रात रविवारी बेपत्ता झालेल्या २४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाचा शोध घेत असलेल्या बचाव पथकाला मोठे यश मिळाले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत १०२ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आ
इंडोनेशियातील जावा समुद्रात बेपत्ता जहाजातील १०२ प्रवाशांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू


जकार्ता, 13 सप्टेंबर (हिं.स.)।इंडोनेशियातील जावा समुद्रात रविवारी बेपत्ता झालेल्या २४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाचा शोध घेत असलेल्या बचाव पथकाला मोठे यश मिळाले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत १०२ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मात्र, या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

माहितीनुसार, हे जहाज रविवारी पूर्व जावामधून बोर्निओ बेटावरील दक्षिण कालीमंतानच्या दिशेने जात होते. त्याचवेळी अचानक जहाजाचा संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाले.या घटनेनंतर तातडीने सुरू करण्यात आलेली मोठ्या प्रमाणावरील शोधमोहीम अद्याप सुरू आहे. स्थानिक बचाव पथके आणि प्रशासन समुद्रात सातत्याने बचावकार्य करत असून, उर्वरित १३७ प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.

दक्षिण कालीमंतान प्रांताची राजधानी बंजारमासिन येथील शोध आणि बचाव कार्यालयाने सांगितले की, ‘वर्गो ट्रान्सपोर्ट ८’ या जहाजात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संपर्क व्यवस्था ठप्प झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. हे जहाज इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या सुरबाया येथून बंजारमासिनकडे जात होते. जहाजाच्या ऑपरेटरने अधिकाऱ्यांना सांगितले की, समुद्रात अचानक हवामान खराब झाल्यानंतर जहाजाशी संपर्क तुटला.

प्राथमिक माहितीनुसार, जहाजाचे शेवटचे लोकेशन जावा समुद्रात नोंदवण्यात आले होते. हे ठिकाण बंजारमासिनच्या किनाऱ्यापासून सुमारे १४८ किलोमीटर अंतरावर आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत किंवा जखमी झाल्याबाबत तातडीची माहिती उपलब्ध नव्हती आणि जहाजापर्यंत लवकरात लवकर पोहोचणे ही बचाव पथकाची प्राथमिकता आहे.

बंजारमासिन बचाव संस्थेचे ऑपरेशन्स प्रमुख अरियांतो अर्दी यांनी जहाजाशी संपर्क तुटल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, बचाव कर्मचाऱ्यांसह बचाव नौका तातडीने त्या समुद्राच्या भागात पाठवण्यात आल्या आहेत.अर्दी यांनी सांगितले की, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शोधमोहीमेचे संचालन करण्यासाठी त्रिशक्ती येथे एक ऑपरेशन्स पोस्ट स्थापन करण्यात आले आहे. बचाव पथके समुद्रात बेपत्ता झालेल्या जहाजाचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande