परभणीत अवैध पानमसाला-तंबाखूचा साठा जप्त; एकाला अटक
परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)। कौसडीफाटा परिसरात अवैधरीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांवर पोलीसांनी कारवाई करत एकूण २७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेतील आरोपी शेख साजिद यास पोलिसांनी अटक केली आहे.
Q

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जावेद पान शॉपच्या पाठीमागील गोडाऊनमधील खालच्या खोलीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या कारवाईत विमल सुगंधित पानमसाला ४० पुडे, रजनीगंधा पानमसाला १५६ पुडे, आरएमडी गुटखा ४५ पुडे, राजनिवास सुगंधित पानमसाला ३४ पुडे, केएम १ जर्दा ५३ पाकिटे, गोवा गुटखा ४० पुडे, आरएन १ तंबाखू २६ पुडे, हिंदुस्तान तंबाखू १० पुडे, पिवळ्या व सिल्वर पत्तीतील तंबाखूची ७ पाकिटे तसेच अँड्रॉईड मोबाईल असा एकूण २७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बोरी पोलीसांचे सहायक पोलिस निरिक्षक अभिजीत अडके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक एस. एन. थोरवे व सहका-यांनी केली. बोरी पोलीसांत भारतीय न्याय संहीता कायद्याच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande