
ठाणे, 13 सप्टेंबर (हिं.स.)। : 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान. गाझीपुर(उत्तर प्रदेश) येथे सीनियर पुरुष/महिला इक्विप्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धा 2026,उत्तर प्रदेश पॉवर लिफ्टिंग असोसिएशन आणि पॉवर लिफ्टिंग इंडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कु. सुश्मिता सुनील देशमुख हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून 52 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले
स्पर्धेत स्कॉट या प्रकरणात 175 किलो करताना पडल्याने उजव्या पायाच्या गुडघ्याच्या तुटल्या डाव्या पायाच्या सुध्दा तुटल्या असताना स्पर्धेतील बेंचप्रेस अणि डेडलिफ्ट हे दोन प्रकार बाकी होते. राजेश आत्माराम लांजेकर यांच्या सहकार्यामुळे अणि पाठिंब्यामुळे स्पर्धा पुर्ण झाली आणि कांस्यपदक मिळविले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर