पूरग्रस्त नेपाळच्या मदतीला भारत; बेली ब्रिजच्या सुट्ट्या भागांची पहिली खेप रवाना
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.)। नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरानंतर भारत सातत्याने नेपाळला मदत करत आहे. आता याच मदतीचा भाग म्हणून भारताने पूरग्रस्त बेट्रावती परिसरातील संपर्क व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी ७० मीटर लांबीच्या बेली ब्रिजच्या सुट्य
पूरग्रस्त नेपाळच्या मदतीला भारत; बेली ब्रिजच्या सुट्या भागांची पहिली खेप रवाना


नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.)। नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरानंतर भारत सातत्याने नेपाळला मदत करत आहे. आता याच मदतीचा भाग म्हणून भारताने पूरग्रस्त बेट्रावती परिसरातील संपर्क व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी ७० मीटर लांबीच्या बेली ब्रिजच्या सुट्या भागांची पहिली खेप नेपाळला पाठवली आहे. ही माहिती भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.

भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सांगितले की, “नेपाळमधील पूरग्रस्त बेट्रावती परिसरातील संपर्क व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मदत म्हणून भारताने ७० मीटर लांबीच्या बेली ब्रिजच्या सुट्या भागांची पहिली खेप नेपाळला पाठवली आहे.”त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, शनिवारी हेटौडा येथे ही खेप नेपाळच्या रस्ते विकास विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. येत्या काही दिवसांत पुलाच्या सुट्या भागांच्या आणखी खेपा नेपाळला पाठवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

काठमांडू येथील भारतीय दूतावासानेही पोस्ट करत म्हटले की, या पुलामुळे अलीकडे आलेल्या अचानक पुरामुळे प्रभावित झालेल्या बेट्रावती परिसरातील संपर्क व्यवस्था पुन्हा सुरू करण्यास मदत होणार आहे.

बेली ब्रिज हा सहज वाहून नेता येणारा, आधीच तयार केलेला मॉड्युलर स्टील ट्रस पूल असतो. जड यंत्रसामग्री किंवा विशेष साधनांची आवश्यकता नसल्याने तो तुलनेने कमी वेळेत हाताने जोडता येतो.शनिवारी देण्यात आलेली ही मदत २६ ऑगस्टपासून भारताकडून नेपाळला दिल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा एक भाग आहे. या पुरात सुमारे १,४०० जणांचा मृत्यू झाला असून, रविवारीपर्यंत ५,००० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताने नेपाळमधील बचाव, मदतकार्य आणि न्यायवैद्यक कामांना सहाय्य करण्यासाठी १३० टनांहून अधिक मदत सामग्री पाठवली आहे. तसेच ५४ तज्ज्ञांना तैनात करण्यात आले आहे. नवी दिल्लीने बोगदे आणि चिखलातून बचावकार्य करण्यासाठी विशेष उपकरणे, डीएनए किट आणि न्यायवैद्यक उपकरणेही उपलब्ध करून दिली आहेत.याशिवाय तात्पुरते निवारे, ब्लँकेट, स्वच्छता किट, सौर दिवे आणि औषधांसारख्या अत्यावश्यक वस्तूही नेपाळला पुरवण्यात आल्या आहेत.

भारतीय हवाई दलाने मदत सामग्री नेपाळमध्ये पोहोचवण्यासाठी किमान आठ विशेष उड्डाणे केली आहेत. भारतीय बोगदा बचाव पथक नेपाळच्या लष्करासोबत मिळून शोधमोहीम राबवत आहे. तसेच एका न्यायवैद्यक पथकाकडून मृतांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नेपाळी अधिकाऱ्यांना मदत केली जात आहे.

पूरग्रस्त नेपाळमधील बचाव, मदत आणि पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराच्या आपत्तीनंतर भारताकडून सातत्याने मदत पाठवली जात आहे. आता भारताने नेपाळला पोर्टेबल बेली ब्रिजच्या सुट्या भागांची खेप सुपूर्द केली आहे. नेपाळमधील पुरात आतापर्यंत सुमारे १,४०० जणांचा मृत्यू झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande