
छत्रपती संभाजीनगर, 13 सप्टेंबर (हिं.स.) एकनाथ शिंदेंवर मराठ्यांनी विश्वास ठेवला, वाशीमधून जीआर घेऊन आलो, शिंदे साहेबांचा सन्मान केला, तेव्हा मराठे गोड लागत होते. समजा माझं आणि फडणवीसांचे चांगले झाले तर तुमचे काय होणार? फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य करून बाजी मारली तर मग मराठ्यांचं आणि फडणवीसांचं चांगलं होईल. मग बाकी त्यांचं काय होणार?, असे मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
आझाद मैदानातील आपल्या आंदोलनाची तारीख 19 सप्टेंबर आहे. आपण सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर उपोषणाला बसणार. आपल्या गरीबाच्या बाजूने न्यायदेवता न्यायाधीश आहेत. आपण कायद्याला मानतो त्यानुसार अर्ज केला आहे. आता परवानगी द्यायची की नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवावे. मुंबईच्या बांधवांनी अर्ज दिला आहे, मी जाणारच. मी कायद्याचे उल्लंघन करत आहे का? तुम्ही अटी शर्ती घालायची असेल तर घाला. नागाच्या शेपटावर पाय दिल्यावर आम्हाला दाखवावं लागतं, असे जरांगेंनी म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis