डब्ल्यूटीसी गुणतालिका : इंग्लंडचा संघ सहाव्या स्थानावर कायम
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. बर्मिंगहॅम येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानला आठ गडी राखून पराभूत करत ३-० ने मालिका जिंकली. यामुळे पाकिस्तानला इंग्ल
इंग्लंडचा क्रिकेट संघ


नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. बर्मिंगहॅम येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानला आठ गडी राखून पराभूत करत ३-० ने मालिका जिंकली. यामुळे पाकिस्तानला इंग्लंड दौऱ्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. आधीच टीकेला सामोरे जात असलेल्या पाकिस्तानच्या अडचणी वाढत आहेत. चला जाणून घेऊया, तिसऱ्या कसोटीनंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत काय बदल झाले आहेत...

पाकिस्तानविरुद्धच्या प्रभावी विजयानंतर इंग्लंडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत प्रगती केली आहे. इंग्लंड १६ सामन्यांतून सात विजय, आठ पराभव आणि एक बरोबरीसह ७४ गुण आणि ३८.५४ PCT सह सहाव्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, श्रीलंका ३३.३३ PCT सह सातव्या स्थानावर कायम आहे. पाकिस्तानची परिस्थिती सर्वात वाईट असून, ते नऊ सामन्यांतून दोन विजय आणि सात पराभवांसह १६ गुणांसह नवव्या स्थानावर तळाशी आहेत. पाकिस्तानचा PCT १४.८१ टक्के आहे. भारत पाचव्या स्थानावर कायम आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या दोन स्थानांवर आहेत.

ऑस्ट्रेलियाने ८०% विजय टक्केवारीसह आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका ७५% विजय टक्केवारीसह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड ७२.२२% विजय टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश ५५.५६% विजय टक्केवारीसह चौथ्या स्थानावर कायम आहे. भारत ५१.५२% विजय टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande