गणेश चतुर्थीनिमित्त उद्या शेअर बाजाराला सुट्टी; एमसीएक्सवर दुसऱ्या सत्रात व्यवहार
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.)। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशांतर्गत शेअर बाजारात उद्या सुट्टी राहणार आहे. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) मध्ये उद्या कोणताही व्यवहार होणार नाही. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज
Stock Market Holiday


नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.)। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशांतर्गत शेअर बाजारात उद्या सुट्टी राहणार आहे. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) मध्ये उद्या कोणताही व्यवहार होणार नाही. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजप्रमाणेच मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) मध्येही गणेश चतुर्थीच्या सुट्टीमुळे दिवसाच्या पहिल्या सत्रात म्हणजे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवहार होणार नाहीत. मात्र, एमसीएक्समध्ये सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११.३० तसेच ११.५५ वाजेपर्यंत दुसऱ्या सत्रात नियमित व्यवहार सुरू राहतील.

स्टॉक एक्स्चेंजच्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीच्या सुट्टीमुळे बीएसईमध्ये उद्या इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंट्स, न्यू डेट सेगमेंट- रिपोर्टिंग, सेटलमेंट अँड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म (एनडीएस-आरएसटी), ट्राय पार्टी रेपो या सर्वांसाठी ट्रेडिंग हॉलिडे राहणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (ईजीआर) आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये दिवसाच्या सत्रात व्यवहार होणार नाहीत. मात्र, या विभागांमध्ये सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ५ ते रात्री ११.३० तसेच ११.५५ वाजेपर्यंत नियमित व्यवहार सुरू राहतील.

त्याचप्रमाणे एनएसईमध्येही गणेश चतुर्थीच्या सुट्टीमुळे इक्विटीज, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, कॉर्पोरेट बॉन्ड्स, न्यू डेट सेगमेंट्स, निगोशिएटेड ट्रेड रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म, म्युच्युअल फंड्स, सिक्युरिटी लेंडिंग अँड बॉरोइंग स्कीम्स, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज या सर्व सेगमेंटमध्ये सुट्टी राहणार आहे. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज वगळता इतर सर्व विभागांमध्ये उद्या कोणताही व्यवहार होणार नाही. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये सकाळच्या सत्रातील ट्रेडिंग बंद राहणार आहे. मात्र, सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ५ ते रात्री ११.३० तसेच ११.५५ वाजेपर्यंत नियमित व्यवहार सुरू राहतील.

स्टॉक मार्केटच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीच्या सुट्टीव्यतिरिक्त शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्टीला वगळता अन्य कोणतीही सुट्टी नाही. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात २ तारखेला महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार होणार नाहीत. याच महिन्यात २० तारखेला स्टॉक मार्केटला दसऱ्याची सुट्टी राहणार आहे. तर १० नोव्हेंबरला बळी प्रतिपदेनिमित्त स्टॉक मार्केटमध्ये सुट्टी राहील. नोव्हेंबर महिन्यात २४ तारखेला श्री गुरु नानक देव गुरु पर्वाची सुट्टी राहणार आहे. त्याचप्रमाणे वर्षाच्या अखेरच्या महिन्यात डिसेंबरमध्ये २५ तारखेला ख्रिसमसची सुट्टी राहणार आहे.

यंदा दिवाळी ८ नोव्हेंबरला रविवारी साजरी केली जाणार आहे. शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे हा दिवस स्टॉक मार्केटच्या हॉलिडे कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. दिवाळीच्या दिवशी रविवारची सुट्टी असली तरी स्टॉक मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. मात्र, मुहूर्त ट्रेडिंगची वेळ नंतर जाहीर केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande