अमृतसर सूरमास 'शेर-ए-पंजाब टी-२० लीग'चे पहिले विजेते
मोहाली (पंजाब), 14 सप्टेंबर (हिं.स.) मोहाली येथील आय.एस. बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात लुधियाना लायन्सचा आठ गडी राखून पराभव करत अमृतसर सूरमासने ''शेर-ए-पंजाब टी-२० लीग''चे पहिले विजेतेपद पटकावले. विजयासाठी आवश्यक असलेले १४३ धावांचे ल
अमृतसर सूरमासचा संघ


मोहाली (पंजाब), 14 सप्टेंबर (हिं.स.) मोहाली येथील आय.एस. बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात लुधियाना लायन्सचा आठ गडी राखून पराभव करत अमृतसर सूरमासने 'शेर-ए-पंजाब टी-२० लीग'चे पहिले विजेतेपद पटकावले. विजयासाठी आवश्यक असलेले १४३ धावांचे लक्ष्य अमृतसर सूरमासने सहजपणे गाठले. त्यांनी केवळ १६.४ षटकांत २ बाद १४४ धावा करत दिमाखात विजेतेपद निश्चित केले.

लुधियाना लायन्सला निर्धारित २० षटकांत १४२ धावांवर रोखल्यानंतर, सूरमासच्या धावसंख्येचा पाया सहज धवनने रचला. त्याने ५३ चेंडूंत नाबाद ६३ धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार नमन धीरने आक्रमक सुरुवात करत अवघ्या १२ चेंडूंत २९ धावांची खेळी केली. राहुल कुमारने ३० चेंडूंत नाबाद ४२ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले; अमृतसर सूरमासने २० चेंडू शिल्लक असतानाच हे लक्ष्य गाठले.

तत्पूर्वी, अमृतसर सूरमासच्या गोलंदाजांनी लुधियाना लायन्सला रोखून धरले. यात मयंक मार्कंडेने १७ धावांत ३ बळी घेत प्रभावी कामगिरी केली. या कामगिरीसाठी त्याला अंतिम सामन्यातील 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.

या विजेतेपदासह नमन धीरच्या शानदार मोहिमेचा यशस्वी समारोप झाला. स्पर्धेत फलंदाजीमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या धीरला 'प्लेअर ऑफ द सीरीज' म्हणून घोषित करण्यात आले. लीग टप्प्यात त्याने ६४ चेंडूंत १७३ धावांची जबरदस्त खेळी केली होती, तसेच उपांत्य फेरीत ३७ चेंडूंत ९१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत अमृतसर सूरमासला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

नमन धीरची स्फोटक कामगिरी अमृतसर सूरमासच्या विजेतेपदाच्या मोहिमेचा मुख्य आधार ठरली. कर्णधार म्हणून त्याने संघाच्या आक्रमक फलंदाजीसाठी सातत्याने योग्य दिशा आणि गती निश्चित केली. संयमित फलंदाजी शिस्तबद्ध गोलंदाजी आणि संपूर्ण स्पर्धेत कर्णधाराचे उत्कृष्ट योगदान यांच्या जोरावर, 'अमृतसर सूरमास'ने निर्णायक क्षणी सर्वोत्तम कामगिरी करत 'शेर-ए-पंजाब टी-२० लीग'चे पहिले विजेतेपद पटकावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande