
पाऊस येऊ दे, शेतकऱ्याला सुखी होऊ दे बाप्पाकडे साकडे
अमरावती, 14 सप्टेंबर (हिं.स.)। गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अमरावतीमध्ये शिव ठाकरेने गणरायाचं स्वागत केलं.
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी शिव ठाकरे यांच्या घरात विशेष तयारी करण्यात आली होती.पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात पूजा-अर्चा आणि आरती करत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शिव ठाकरेने कुटुंबीयांसोबत गणरायाचं दर्शन घेतलं. भक्तिमय वातावरणात बाप्पाच्या चरणी सुख-समृद्धी आणि सर्वांच्या आनंदासाठी प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान, शिव ठाकरेने चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. बाप्पाच्या चरणी लीन होत असताना शिव ठाकरेनं यांनी लाडक्या बाप्पाकडे, साकडं घाातलं ,आपल्या बळीराजाला सुखी होऊ दे. 'पावसाचा येऊ दे, शेतकरी सुखी होऊ दे, जय जवान जय किसान हा आमचा नारा आहे,' अशा शब्दांत त्यानं शेतकऱ्यांच्या सुख-समाधानासाठी प्रार्थना केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी