दक्षिण आफ्रिकेत दोन मिनीबसची धडक; २१ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
प्रिटोरिया, 14 सप्टेंबर (हिं.स.)।दक्षिण आफ्रिकेतील एका प्रमुख महामार्गावर दोन मिनीबस टॅक्सींची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर आणखी एक वाहन या दोन्ही वाहनांना धडकले. या भीषण अपघातात किमान २१ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रोड
दक्षिण आफ्रिकेत दोन मिनीबसची धडक; २१ जणांचा मृत्यू, अनेक जखमी


प्रिटोरिया, 14 सप्टेंबर (हिं.स.)।दक्षिण आफ्रिकेतील एका प्रमुख महामार्गावर दोन मिनीबस टॅक्सींची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर आणखी एक वाहन या दोन्ही वाहनांना धडकले. या भीषण अपघातात किमान २१ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

रोड ट्रॅफिक मॅनेजमेंट कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वेस्टर्न केप प्रांतात हा अपघात झाला. केपटाऊनपासून सुमारे ३८० किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रिन्स अल्बर्ट आणि ली-गामका या शहरांदरम्यान हा अपघात घडला.वेस्टर्न केपमधील आपत्कालीन सेवा आणि अधिकारी घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे एजन्सीने सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री झालेल्या अपघातातील तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.वेस्टर्न केपच्या मोबिलिटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन मिनीबस टॅक्सींची समोरासमोर धडक झाल्यानंतर हा अपघात झाला. त्यानंतर एका एसयूव्हीने या दोन्ही वाहनांना धडक दिली.

अपघातानंतर घटनास्थळावरील एन-१ महामार्ग बंद करण्यात आला आहे. रोड ट्रॅफिक मॅनेजमेंट कॉर्पोरेशनने या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे.

दक्षिण आफ्रिकेत लाखो नागरिकांसाठी मिनीबस टॅक्सी हे सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. मात्र, या वाहनांशी संबंधित जीवघेणे अपघात वारंवार घडत असतात. जानेवारीमध्ये मिनीबस टॅक्सींच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये किमान २५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात १४ मुलांचा समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande