ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, १३ खलाशी बचावले, एक बेपत्ता; भारताकडून निषेध
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.)।पुन्हा एकदा समुद्रात भारतीय व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्यात आले. ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाज एमटी एल गाया वर हल्ला झाला. हल्ल्याच्या वेळी या जहाजावर १४ कर्मचारी होते. हे सर्व कर्मचारी भारतीय नागरिक होते. त्यापै
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, १३ खलाशी बचावले, एक बेपत्ता; भारताकडून निषेध


नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.)।पुन्हा एकदा समुद्रात भारतीय व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्यात आले. ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाज एमटी एल गाया वर हल्ला झाला. हल्ल्याच्या वेळी या जहाजावर १४ कर्मचारी होते. हे सर्व कर्मचारी भारतीय नागरिक होते. त्यापैकी १३ जणांना वाचवण्यात यश आले असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, भारताने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत पश्चिम आशियातील तणाव तातडीने कमी करण्याचे आवाहन केले. जहाजावर १४ भारतीय नागरिक होते, त्यापैकी १३ जणांना आतापर्यंत वाचवण्यात आले असून, बेपत्ता नागरिकाचा शोध सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले.परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) एका निवेदनात म्हटले आहे की, ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, बचावकार्यामध्ये त्यांच्यासोबत सक्रियपणे समन्वय साधत आहे. भारतीय नागरिकांना केलेल्या मदतीबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “तणाव तातडीने कमी करण्यासाठी आणि या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याच्या आमच्या आवाहनाचा आम्ही पुनरुच्चार करतो.” मंत्रालयाने पुढे म्हटले की, “या भागातील व्यापारी जहाजे, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य आहे. या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर मुक्त आणि सुरक्षित नौकानयन तसेच व्यापाराचा प्रवाह शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे आम्ही आवाहन करतो.”

नवी दिल्ली येथे ब्रिक्स शिखर परिषद सुरू असतानाच हा हल्ला झाला आहे. या परिषदेत जहाजांवरील हल्ले आणि भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षित सागरी मार्गांच्या महत्त्वावर भर दिला होता. सरकारच्या म्हणण्यानुसार, अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यापासून या भागात मृत्युमुखी पडलेल्या १६ खलाशांमध्ये १० भारतीय खलाशांचा समावेश आहे.

शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आणि प्रादेशिक संकटांमुळे वाढत्या धोक्यांचा सामना करणाऱ्या खलाशांच्या सुरक्षेसाठी ‘खलाशी आपत्कालीन सहाय्यता जाळे’ स्थापन करण्याचे आवाहन केले. जागतिक व्यापाराच्या प्रवाहात खलाशांची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यामुळे त्यांची सुरक्षा ही सर्वांसाठी प्राधान्याची बाब असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराण आणि ओमान हे होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नवीन प्रवेश आणि निर्गमन मार्ग निश्चित करण्यावर सहमत झाले आहेत. वृत्तानुसार, इराणी अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande