‘मंगला गौरी’चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज
मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.)। अभिनेत्री रुक्मिणी वसंत आगामी कन्नड चित्रपट ‘मंगला गौरी’मध्ये अगदी नव्या अंदाजात दिसणार आहे. राहुल पी.के. यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रुक्मिणी पोलिसां
Rukmini Vasanth new avatar Mangala Gauri


मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.)। अभिनेत्री रुक्मिणी वसंत आगामी कन्नड चित्रपट ‘मंगला गौरी’मध्ये अगदी नव्या अंदाजात दिसणार आहे. राहुल पी.के. यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रुक्मिणी पोलिसांचा गणवेश परिधान करून स्कूटरवर बसलेली दिसत आहे. त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री मालाश्रीही दिसत आहेत. चित्रपटात वेगवेगळ्या पिढ्यांतील या दोन्ही अभिनेत्री कथेच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

रुक्मिणी आपल्या सहज अभिनयासाठी आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जातात. ‘मंगला गौरी’मध्ये त्या पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक हेमंत एम. राव यांच्यासोबतचा हा तिचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी ‘सप्त सागरदाचे एलो’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. केव्हीएन प्रॉडक्शन्ससोबतही रुक्मिणीचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्या ‘टॉक्सिक’मध्ये दिसल्या होत्या.

केव्हीएन प्रॉडक्शन्स आणि दक्षिणायनी टॉकीजच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाला मिधुन मुकुंदन यांनी संगीत दिले आहे, तर श्रीवत्सन सेल्वराजन यांनी छायांकन केले आहे. चित्रपटातील ॲक्शनची जबाबदारी विक्रम मोर यांनी सांभाळली आहे. व्यंकट के. नारायण आणि हेमंत एम. राव हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे सुमारे ७५ टक्के चित्रीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामही वेगाने सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande