वांद्रे येथे साकारली प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती
* वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची यंदाची भव्य आरास मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.) - देशातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख मुंबईकरांना करून देणाऱ्या वा
सोमनाथ मंदिर प्रतिकृती


गणेशमूर्ती


शिवलिंग


* वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची यंदाची भव्य आरास

मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.) - देशातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख मुंबईकरांना करून देणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गुजरातमधील प्रसिद्ध श्री सोमनाथ मंदिराची भव्य आरास साकारली आहे. मंडळाचे संस्थापक व सल्लागार तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ही आरास साकारण्यात येणार आहे.

यंदाचा गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना देशातील ऐतिहासिक, धार्मिक आणि स्थापत्यवैभवाची माहिती मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande