डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या कार्याला चिरस्थायी स्मारकातून उजाळा
पुतळा, संग्रहालय, वाचनालयासह कार्याची माहिती देणारे विविध उपक्रम ज्ञानस्रोत केंद्राला त्यांचे नाव देण्याची मागणी लातूर, १५ सप्टेंबर (हिं.स.)। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या शैक्षणिक व सामा
जनार्दन वाघमारे


पुतळा, संग्रहालय, वाचनालयासह कार्याची माहिती देणारे विविध उपक्रम

ज्ञानस्रोत केंद्राला त्यांचे नाव देण्याची मागणी

लातूर, १५ सप्टेंबर (हिं.स.)। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला चिरस्थायी स्मारकाच्या माध्यमातून उजाळा देण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

या स्मारकात डॉ. जनार्दन वाघमारे यांचा पुतळा, संग्रहालय, वाचनालय तसेच त्यांच्या जीवनकार्याची आणि शैक्षणिक योगदानाची माहिती देणारे विविध उपक्रम असणार आहेत. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान, विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्राला ‘डॉ. जनार्दन वाघमारे ज्ञानस्रोत केंद्र’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. डॉ. वाघमारे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून ही नामकरणाची मागणी करण्यात आली आहे.

डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या कार्याचा गौरव करणारे स्मारक उभारल्यास त्यांच्या विचारांचा आणि शैक्षणिक दृष्टिकोनाचा परिचय विद्यार्थी, संशोधक आणि नव्या पिढीला सातत्याने होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande