राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासची लातूर जिल्हा कार्यकारणी जाहीर
नऊ तालुकाध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रा. तात्यासाहेब नांदवे जिल्हाध्यक्ष लातूर, १५ सप्टेंबर (हिं.स.)। संस्थापक अध्यक्ष तथा पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासची लातूर जिल्हा कार्यकारणी जाहीर
निवड


नऊ तालुकाध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

प्रा. तात्यासाहेब नांदवे जिल्हाध्यक्ष

लातूर, १५ सप्टेंबर (हिं.स.)। संस्थापक अध्यक्ष तथा पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासची लातूर जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ तालुकाध्यक्षांसह विविध पदांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या श्रीमती कल्पना इनामदार, दत्ता आवारी व शेख यांच्या मान्यतेने नूतन लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. तात्यासाहेब नांदवे यांनी ही कार्यकारणी जाहीर केली. राळेगणसिद्धी येथील मुख्य कार्यालयातून ज्येष्ठ समाजसेवक तथा संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हजारे यांच्या मान्यतेने कल्पनाताई इनामदार व दत्ताभाऊ आवारी यांनी प्रा. तात्यासाहेब नांदवे यांची लातूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.

जिल्हा कार्यकारणीत जिल्हा सचिवपदी रामेश्वर बाबुराव सूर्यवंशी व संजय तुकाराम कुंटेवाड, जिल्हा सहसचिवपदी शरद श्रीमंत भोसले, जिल्हा सहसचिव तथा जिल्हा संपर्क व प्रसिद्धीप्रमुखपदी राजकुमार बाबुराव भंडे, जिल्हा चिटणीसपदी सुभान पुंडलिक रकटे, जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) सुधीर पुरी, जिल्हा उपाध्यक्ष (शहर) राजेंद्र रघुनाथ दुबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुखपदी गणेश चन्नागीरे, अडत दुकान आघाडी प्रमुखपदी चंद्रकांत चव्हाण, आरोग्य आघाडी जिल्हाप्रमुखपदी अमोल शिंदे आणि महिला आघाडी प्रमुखपदी रेश्मा रामेश्वर सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.

तालुकाध्यक्षपदी लातूर तालुक्यासाठी अरविंद पांडुरंग शिंदे, चाकूरसाठी लिंबाजी हजारे, निलंग्यासाठी नारायण सोमवंशी, रेणापूरसाठी नंदकुमार राऊत, औसासाठी नामदेव म्हेत्रे, शिरूर अनंतपाळसाठी उत्तम कदम, जळकोटसाठी बाळासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, देवणीसाठी रवींद्र धोंडीबा गायकवाड आणि उदगीरसाठी राजकुमार बाबुराव भंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लातूर शहर अध्यक्षपदी रावजी नामदेव कांबळे यांची निवड करण्यात आली असून अहमदपूर तालुकाध्यक्षपदाची निवड अद्याप प्रतीक्षेत आहे.

या सर्व निवडी १५ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. तात्यासाहेब नांदवे यांनी जाहीर केल्या. नूतन पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचे संघटनात्मक काम अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande